Ranveer Singh : न्यूड फोटोशूटप्रकरणी तांत्रिक तपास सुरू, रणवीर सिंगला मुंबई पोलीस समन्स बजावण्याच्या तयारीत
अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) मुंबई पोलीस (Mumbai Police) समन्स बजावण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. न्यूड फोटोशूट (Nude Photography) प्रकरणी हा तांत्रिक तपास सुरू झाला आहे. मुंबई पोलीस सायबर पोलिसांची मदत घेत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे. फोटोशूट कुठे शूट झालं, कोणती खाती वापरण्यात आली, यासारख्या माहितीसाठी चेंबूर पोलीस सायबर पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती आहे. अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.