गुलाबराव पाटील यांनी म्हटलं अडीच वर्षांपूर्वी आपलं लव्ह मॅरेज तुटलं,रावसाहेब दानवे म्हणतात तुमचं लव्ह मविआसोबत!
सिल्लोडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यामध्ये टोलेबाजी पहायला मिळाली.
औरंगाबाद : सिल्लोडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यामध्ये टोलेबाजी पहायला मिळाली. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले अडीच वर्षांपूर्वी आमची भाजपसोबतची युती तुटली. लव्ह मॅरेज तुटलं, पण योगायोगाने पुन्हा जुळून आलं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांनी देखील तेवढ्याच मिश्किलपणे उत्तर दिलं. गुलाबराव आपलं लव्ह मॅरेज नव्हत तर अरेंज मॅरेज होतं. लव्ह मॅरेज तुम्ही त्यांच्यासोबत केलं होतं. लव्ह मॅरेज करताना तुमच्या ज्या काही खाणाखुणा सुरू होत्या, त्या मला कळाल्या होत्या असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगवाला.
Published on: Oct 18, 2022 09:00 AM
Latest Videos