Special Report | ...आता शिवसेना खासदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा

Special Report | …आता शिवसेना खासदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा

| Updated on: Apr 29, 2022 | 10:09 PM

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर आता साकीनाका पोलिसात महिलेची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तर भाजपचे आमदार गणेश नाईक बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत.

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर आता साकीनाका पोलिसात महिलेची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तर भाजपचे आमदार गणेश नाईक बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत. नाईक यांच्यासारखेच आता तर राहुल शेवाळेंविरोधातही बलात्काराचा आरोप करण्यात आला असल्याने राजकीय वातावरणात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मात्र राहुल शेवाळेंविरोधात साकीनाका पोलिसांनी अजून तरी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असला तरी राहुल शेवाळेंनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आरोप केले गाले आहेत. मी निर्दोष असून कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे असं शेवाळे म्हणतात. माझ्याविरोधात केलेल्या तक्रारीमागे कोण आहे याचा पर्दापाश लवकरच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल शेवाळेंच्या आधी रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्यानंतर चित्रा वाघ यांनी दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असा दावा या प्रकरणातील पीडितेने केला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. त्यानंत गुन्हा मागे घेण्यासाठी कुचिक दबाव टाकत असल्याचा आरोपही पीडितेकडून करण्यात आला आहे.