‘भाजपवाल्यानो… आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो’, महादेव जानकरांना संताप अनावर

| Updated on: Nov 10, 2024 | 4:25 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना भाजपवरच त्यांनी हल्लाबोल केला आहे. बघा काय म्हणाले महादेव जानकर ?

भाजपाची मस्ती वाढली आहे. त्यांनी काय केलं शिवसेनेत फूट पाडली. यासोबत राष्ट्रवादी देखील फोडली. कुठला माणूस कुठं ठेवायचा नाही. आम्ही काय केलं होतं. आमचे एक दोन आमदार होते ते आमचे आमदार पण पळवले. आमचा आमदार निवडून येतो, आमच्या पक्षावर आणि तुम्ही भाजप बरोबर घेऊन जाता, असा हल्लाबोल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर केला. आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो भाजपवाल्यानो… तुम्ही काळजी करू नका, असा खोचक टोलाही महादेव जानकर यांनी लगावला. पुढे ते असेही म्हणाले, काहीजण म्हणायचे महादेव जानकर असं काही खरं नाही पण महादेव जानकर बोलतो सांगतो तो पाळतो. मी चाळीस वर्षांपूर्वी सांगितलं होतं एक दिवस पंतप्रधान होईल मी आज माझी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे भाषण करत आहे. तेही मा‍झ्या पक्षातून करत आहे. त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारलं. आम्हाला बोलवलं नाही जेवायला तर जायचं कशाला आम्ही स्वाभिमानी माणसं असल्याचे महादेल जानकर म्हणाले.

Published on: Nov 10, 2024 04:25 PM
Mahayuti Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यात ‘लाडक्या बहिणीं’सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, बघा काय आहे खास?
‘लाडक्या बहिणीं’ना जाहीर दम देणं धनंजय महाडिकांना भोवणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय