‘भाजपच्या जीवावर किती दिवस? जागा द्या अन्यथा’; महादेव जानकर यांचा भाजपला इशारा
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने प्रहारचे बच्चू कडू, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंढरपूर : गेल्या काही दिवसापासून युतितील मित्र पक्षांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने प्रहारचे बच्चू कडू, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर जानकर यांनी गेल्या महिन्यातच आम्हाला लोकसभेसह विधानसभेच्या जागा द्या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे त्यांनी म्हटलं होतं. आता देखील त्यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी आगामी काळात भाजपने जर आमचा विचार केला नाही. आम्ही भाजपची साथख सोडू. तसेच लोकसभेला 48 जागा लढू असा निर्धार बोलून दाखवला आहे. याचबोरबर त्यांनी भाजप किती दिवस अवलंबून राहायचं म्हणत आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे. त्यामुळेच जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करत असल्याचे ते म्हणाले. ही जनस्वराज्य यात्रा लोकसभेच्या 48 मतदारसंघातून जाईल अशीही त्यांनी घोषणा केली.