Mahadev Jankar | राष्ट्रीय समाज पक्षालाही हवे कॅबिनेट, अध्यक्ष महादेव जानकर यांची मागणी
Mahadev Jankar | राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट पद हवे आहे. अध्यक्ष महादेव जानकर यांनी याविषयीची मागणी पुन्हा उचलून धरली आहे.
Mahadev Jankar | राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) कॅबिनेट (Cabinet)पद हवे आहे. अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी याविषयीची मागणी पुन्हा उचलून धरली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी त्यांनी धाव घेतली. सध्या सरकाचे काम जोरदार सुरु आहे. एकाच महिन्यात सरकारने विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी 53 शासन आदेश काढले आहेत. विकासासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत एका महिन्यात लगेचच एखाद्या सरकारचे ऑडिट करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. त्याआधारे पक्षाला एक कॅबिनेट पद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि सचिवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मागणी पूर्ण होते का हे लवकरच स्पष्ट होईल.
Published on: Sep 01, 2022 02:00 PM
Latest Videos