शेकडो रिफायनरी विरोधक बारसुच्या रानमळावर जोरदार घोषणाबाजी, ठिय्या

शेकडो रिफायनरी विरोधक बारसुच्या रानमळावर जोरदार घोषणाबाजी, ठिय्या

| Updated on: Apr 24, 2023 | 1:04 PM

रखडलेल्या सर्व्हेला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता रिफायनरीच्या सर्व विरोधात विरोधक एकवटले आहेत

रत्नागिरी : जिल्ह्यातील बारसू रिफायनरीसाठी आज सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु करण्यात येणार आहे. याला आता विरोध होताना दिसत आहे. तर रखडलेल्या सर्व्हेला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता रिफायनरीच्या सर्व विरोधात विरोधक एकवटले आहेत. तर शेकडो रिफायनरी विरोधक बारसुच्या रानमळावर आले आहेत. त्यांच्याकडून रिफायनरी विरोधक जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर सर्वे रद्द होईपर्यंत रिफायनरी विरोधक ठिय्या केला जाणार आहे.

Published on: Apr 24, 2023 01:04 PM