माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार बारसू ग्रामस्थांशी संवाद; घेणार पत्रकार परिषद
याचदरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथे येणार आहेत. यावेळी ते कातळशिल्पाची पाहणी करतील. बारसूतील ग्रामस्थांशी चर्चा करतील. त्यानंतर ते एका सभेलाही संबोधित करणार आहेत.
मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्प वादात सापडला आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा दिलाय. तर भाजपने बारसू रिफायनरी प्रकल्पाल त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. याचदरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथे येणार आहेत. यावेळी ते कातळशिल्पाची पाहणी करतील. बारसूतील ग्रामस्थांशी चर्चा करतील. त्यानंतर ते एका सभेलाही संबोधित करणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आव्हान दिल्याने कोकणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर राणे यांच्या नेतृत्वातत रिफायनरी समर्थनार्थ ही मोर्चा निघणार आहे. तर कोकणातील काही आंडूपाडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्या आहेत. पण आम्ही बारसूत जाणारच आहोत, असं ठाकरे गटाने ठणकावलं आहे. त्यामुळे सध्या कोकणातील राजकारण ढवळून निघालं आहे.