बारसू रिफायनरी प्रकल्प वाद चिघळणार? उद्धव ठाकरे यांना जाण्यासाठी परवानगी मिळाली?

बारसू रिफायनरी प्रकल्प वाद चिघळणार? उद्धव ठाकरे यांना जाण्यासाठी परवानगी मिळाली?

| Updated on: May 05, 2023 | 2:34 PM

भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा देत आपणही तेथे जाऊ असं म्हटलं होतं. त्यादरम्यानच आता रत्नागिरीतील जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.

मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्प वादात सापडला आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा दिलाय. तर भाजपने बारसू रिफायनरी प्रकल्पाला. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. यावरून ठाकरे गटात आणि भाजपमध्ये कलगितूरा चांगलाच रंगलेला आहे. याचवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वज्रमूठ सभेत मोठी घोषणा करत आपण बारसूत जाणार असल्याचे सांगितले. ते 6 मे रोजी बारसूत जाणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा देत आपणही तेथे जाऊ असं म्हटलं होतं. त्यादरम्यानच आता रत्नागिरीतील जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना रत्नागिरीत जाण्याची परवानगी मिळते काय याच्यावर चर्चा सुरू होती. ती परवानगी आता ठाकरे यांना मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे यांचा बारसूत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर यामुळे कोकणातील राजकारण आणि रिफायनरी प्रकल्प वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Published on: May 05, 2023 02:34 PM