राणे कुटुंबाचं नेतृत्व एका विधानसभा मतदारसंघापुर्ते; ते ही निस्तनाबूत होईल; शिवसेना नेत्याची खरमरित टीका

राणे कुटुंबाचं नेतृत्व एका विधानसभा मतदारसंघापुर्ते; ते ही निस्तनाबूत होईल; शिवसेना नेत्याची खरमरित टीका

| Updated on: May 06, 2023 | 9:25 AM

रिफायनरीच्या मुद्यावरून आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसू सोलगाव (Barsu Refinery) रिफायनरीच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. रिफायनरीच्या मुद्यावरून (Ratnagiri Refinery) आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत. त्यावरून विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राणे कुटुंबियांवर पलटवार करताना टीका केली आहे. दानवे यांनी, राणे कुटुंबाचं नेतृत्व या कोकणातून नेस्तनाबूत झालं आहे. कोकणवासियांनी ते केलं आहे. ते नेतृत्व आता थोडंसं एका विधानसभेत उरलं आहे. ते ही नेस्तनाबूत होईल. राणे म्हणजे कोकणाचे कोणी जागीरदार नाही बादशहा नाहीत. कोकण हा सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा आहे. या निसर्गावर प्रेम करणाऱ्या, भूमीवर प्रेम करणाऱ्याचा कोकणाच्या माणसाचा आहे. त्यामुळे त्याचं संरक्षण व्हावं हीच शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचे दानवे म्हणाले.

Published on: May 06, 2023 09:25 AM