चिपळूणकरांना पुन्हा पुराचा धोका? वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ; बाजारपेठेत पाणी शिरलं!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मूसळधार पाऊस कोसळतोय. रत्नागिरीतही पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका उद्भवला आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
रत्नागिरी, 25 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मूसळधार पाऊस कोसळतोय. रत्नागिरीतही पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका उद्भवला आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच आता चिपळुणातील बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. चिपळूण नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतं आहे. या परिसरात दुकानाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. बाजारपेठेमधील रस्ता देखील पाण्याखाली गेले आहेत.या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
Published on: Jul 25, 2023 02:20 PM
Latest Videos