महादजी शिंदे कोण? ते कोणासोबत लढले? माहित तरी आहे का?; सावंत यांचा शिंदे यांना टोला

महादजी शिंदे कोण? ते कोणासोबत लढले? माहित तरी आहे का?; सावंत यांचा शिंदे यांना टोला

| Updated on: Mar 20, 2023 | 2:00 PM

शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे यांनी भव्य सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर खासदार अरविंद सावंत यांनी दिलं आहे.

नवी दिल्ली : दिवसांपूर्वीच रत्नागिरीतील खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदार खासदारांवरही टीका केली होती. दरम्यान, आज त्याच मैदानावर शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर भव्य सभा झाली. यावेळी शिंदे यांनी, बाळासाहेब हे तुमचे वडील होते, हे किती वेळा सांगणार? ते संपूर्ण जगाला मान्य आहे. पण ते सर्व शिवसैनिकांचं दैवत होतं. तुम्ही त्यांना वडील वडील करुन संकुचित करु नका. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका, राज्याची जनता सुज्ञ आहे, ती माफ करणार नाही”, अंसही ठाकरेंना सुनावलं होतं.

त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. सावंत यांनी, ते कोणासोबत लढले हे ज्यांना माहित नाही, त्या मूर्खपणा बद्दल काय बोलायचं, असा टोला शिंदे यांना लगावला. तर राहुल गांधी यांच्यावर गदारोळ करून सत्ताधारी भाजपला अधिवेशन चालवायचं नाही हेच कळत नसल्याचेही ते म्हणाले. तर एखाद्या प्रश्नावर सभागृहात चर्चा होणे महत्त्वाचं असल्याचेही ते म्हणाले.

Published on: Mar 20, 2023 02:00 PM