Ratnakar Gutte | मतदारांना वाटपासाठी आणलेला पैसा लुबाडलेलाच, तुम्ही उमेदवारांना लुबाडा, रत्नाकर गुट्टेंचे धक्कादायक वक्तव्य

Ratnakar Gutte | मतदारांना वाटपासाठी आणलेला पैसा लुबाडलेलाच, तुम्ही उमेदवारांना लुबाडा, रत्नाकर गुट्टेंचे धक्कादायक वक्तव्य

| Updated on: Aug 04, 2022 | 3:40 PM

Ratnakar Gutte | रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जाहीर सभेत गुपीत गोष्ट जगजाहीर केली.

Ratnakar Gutte | राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांनी लोकशाहीत मतदार आणि मतदान कसे विकत घेतल्या जातात, ही वाच्यता न करण्याची बाब एका कार्यक्रमादरम्यान जगजाहीर केली. मतदारांना त्यांनी आवाहन केले की मतदारांना वाटण्यासाठी आणलेला हा पैसा लुबाडलेलाच असतो. उमेदवाराची स्वकमाई नसते तर वरकमाई असते, असे अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बोलण्याचा रोख होता. त्यांनी लुबाडून आणलेली रक्कम तुम्हाला लुबडण्यात काय अडचण आहे? असा रोकडा सवाल करत तिघांकडून मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेला पैसा घेण्याची आणि चौथ्यालाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या किश्यावर उपस्थित लोकात एकच हश्या पिकला. मात्र लोकशाहीची लक्तरे त्यांनी वेशीवर टांगली. मतदार, मतदान (Voters, voting) आणि पैसा या भोवतीच निवडणुकीची गणित फिरते याची पोचपावती त्यांनी देऊन टाकली. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अजून कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Published on: Aug 04, 2022 03:23 PM