‘आमच्याकडेही महिलांचा फिडबॅक येतोय, …म्हणून महिलाच’; महिला अत्याचारावरून राऊत यांची टीका
याचदरम्यान दोन महिन्यांपूर्वी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याचेही आता उघड झाले आहे. ही घटना थौबाल जिल्ह्यातील असून ती ४ मे २०२३ रोजी घडली. मात्र त्यावरून आता दोन महिन्यात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मुंबई | 22 जुलै 2023 : मणिपूरमधील हिसांचारावरून समाज माध्यमांवर आता अनेक व्हिडिओ समोर येत आहे. ज्यावरून मणिपूरमधील भाजप सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. याचदरम्यान दोन महिन्यांपूर्वी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याचेही आता उघड झाले आहे. ही घटना थौबाल जिल्ह्यातील असून ती ४ मे २०२३ रोजी घडली. मात्र त्यावरून आता दोन महिन्यात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून पंतप्रधान मोदी यांनी देखील भाष्य करताना माझं मन दुःख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरमध्ये घडलेली घटना कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. ज्यांनी हे केलं त्यांना सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पण आता यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांनी यावेळी कांद्यावरून दिल्लीत सरकार बदललं होतं आणि आता ममत बॅनर्जी म्हणतात तसं राज्यातील आणि देशातील महिला या सरकार बदलतील. महागाई इतर विषयांसह मणिपूरच्या या घटनेमुळे देशातील महिला संतप्त झाल्या आहेत असेही राऊत यांनी म्हटलं आहे.