भाजपसोबत राष्ट्रवादी होतीच ना? मग राष्ट्रवादी का फोडली?; संजय राऊत यांचा फडणवीस यांना सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असे म्हटलं होतं. तसेच उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसला, म्हणूनच अजित पवार यांना बरोबर घेऊन शपथ घ्यावी लागली असं वक्तव्य फडणवीस यांनी म्हटलं होतं.
मुंबई, 25 जुलै 2023 | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडून गेलेल्या आहेत. त्यात अजित पवार गटाचा सत्तेत प्रवेश ही मोठी घटना होती. यानंतर ठाकरे गटाकडून अनेक वेळा टीका झालेली आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असे म्हटलं होतं. तसेच उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसला, म्हणूनच अजित पवार यांना बरोबर घेऊन शपथ घ्यावी लागली असं वक्तव्य फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांनी खरमरीत सवाल करताना त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी फडणवीस यांनी, ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असे म्हणताना अजित पवार यांना सोबत घेतल्याचं म्हटलं होतं. तर ठाकरे पाठीत खंजीर खुपसला म्हणून तुम्ही शिवसेना फोडली, मग अजित पवार आणि राष्ट्रवादीनं असं काय केलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस का फोडली असा सवाल केला आहे.