Video : औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनचं समर्थन?

Video : औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनचं समर्थन?

| Updated on: May 15, 2022 | 4:21 PM

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर डोकं टेकलं होतं. त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना आता अभिनेत्री रवीन टंडनने (Raveena Tandon) त्यांच्या कृत्याचं समर्थन केल्याचं म्हटलं जात आहे. रवीनाने यासंदर्भात एक ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा होत आहे. ‘काही काळापूर्वी […]

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर डोकं टेकलं होतं. त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना आता अभिनेत्री रवीन टंडनने (Raveena Tandon) त्यांच्या कृत्याचं समर्थन केल्याचं म्हटलं जात आहे. रवीनाने यासंदर्भात एक ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा होत आहे. ‘काही काळापूर्वी माझ्या मातृभूमीला ‘असहिष्णू’ असं लेबल लावणं म्हणजे एक फॅशन बनलं होतं. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता कुठे आहे’, असा सवाल तिने केला.

Published on: May 15, 2022 04:21 PM