Ravi Rana on ED Inquiry | आता कुणालाही सोडलं जाणार नाही, संजय राऊत यांच्यावरील कारवाई योग्यच, रवी राणा यांचे सूचक वक्तव्य

Ravi Rana on ED Inquiry | आता कुणालाही सोडलं जाणार नाही, संजय राऊत यांच्यावरील कारवाई योग्यच, रवी राणा यांचे सूचक वक्तव्य

| Updated on: Aug 01, 2022 | 5:13 PM

Ravi Rana on ED Inquiry | आता कोणालाही सोडलं जाणार नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाई योग्यच असल्याचं सूचक वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे.

Ravi Rana on ED Inquiry | आता कोणालाही सोडलं जाणार नाही. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील कारवाई योग्यच असल्याचं सूचक वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केलं आहे. तपासादरम्यान ईडीला (ED) राऊत यांच्याविरोधात पुरावे मिळालेत. त्यानुसार, अगोदर त्यांना नोटीस देण्यात आली. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली. पुन्हा त्यांना संधी देण्यात आली. त्यांची चौकशी झाली आणि रात्री त्यांना अटक करण्यात आली. ईडी ही सक्षम यंत्रणा आहे. ती निःपक्षपणे चौकशी करते. त्यात तथ्य आढळल्यानंतर, पुरावे मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येते. महाविकास आघाडीचं सरकार असताना राऊत यांनी बिल्डर, व्यावसायिक यांच्याकडून कमीशन घेतले. त्याआधारे अवैध मालमत्ता जमा केली. त्याचा हिशेब न जुळल्यानंच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

Published on: Aug 01, 2022 05:00 PM