रवी राणा यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘हा’ उमेदवार भाजपमध्ये येणार
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ३३ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यातील १० जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीत आता २३ उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती : भारतीय जनता पार्टीचे रणजीत पाटील ( ranjit patil ) , काँग्रेसचे धीरज रामभाऊ लिंगाडे ( rambhau lingade ), वंचित बहुजन आघाडीचे अनिल ओमकार अमलकार ( anil amalkar ) यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजपचे रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघातील २३ उमेदवारांपैकी ९ उमेदवार आपल्या संपर्कात असून ते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. इतकेच नाही तर काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला तर तो ही भाजपमध्ये येण्यास तयार आहे असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे त्यामुळे अनेक जण आमच्या संपर्कात येत आहेत असेही ते म्हणाले.

नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं

नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत

दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
