Special Report | फडणवीस ऑन फूल डिमांड!..

| Updated on: Aug 22, 2022 | 1:48 AM

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीनंतर पुणे लोकसभेसाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. आणि त्या चर्चेवर फडणवीस पुण्यातून उभे राहिले, तर आनंदच होणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश बापटांनी दिलीय.

अमरावती : मला उपमुख्यमंत्री म्हणताना त्रास होतोय, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीत केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीनंतर पुणे लोकसभेसाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. आणि त्या चर्चेवर फडणवीस पुण्यातून उभे राहिले, तर आनंदच होणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश बापटांनी दिलीय. मात्र दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अपक्ष आमदार रवी राणा 2024 साठी फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पाहतायत.  फडणवीसांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याची चर्चा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीनंतर सुरु झाली. पुणे लोकसभेसाठी फडणवीसांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी महासंघानं भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डांना केलीय. दरम्यान याच मुद्दयावरुन राष्ट्रवादीनं फडणवीसांना नागपुरात पराभवाची भीती वाटत असल्याचा आरोप केलाय.

Published on: Aug 22, 2022 01:48 AM