Video : मुख्यमंत्र्यांची मर्दानी 14 तारखेच्या सभेत कळेल- रवी राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना ललकारले आहे. ज्यांनी विचार सोडले त्यांची येत्या 14 मे रोजी सभा आहे. त्यांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवण्यासाठी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत, असं सांगतानाच हिंमत असेल तर 14 तारखेच्या सभेत तुम्ही कुठून लढणार त्या मतदारसंघाची घोषणा करा. मी तुमच्या विरुद्ध लढण्यास तयार […]
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना ललकारले आहे. ज्यांनी विचार सोडले त्यांची येत्या 14 मे रोजी सभा आहे. त्यांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवण्यासाठी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत, असं सांगतानाच हिंमत असेल तर 14 तारखेच्या सभेत तुम्ही कुठून लढणार त्या मतदारसंघाची घोषणा करा. मी तुमच्या विरुद्ध लढण्यास तयार आहे, असं आव्हानच नवनीत राणा यांनी दिलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मर्दानी 14 तारखेच्या सभेत कळेल, असं रवी राणा म्हणालेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना सत्तेचा मोह नव्हता. त्यांनी कधी निवडणूक लढली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा दिल्लीत आहेत. दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची त्यांनी कालच भेट घेऊन त्यांच्यावर झालेला अन्याय कथन केला. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं. यावेळी त्यांनी आपण कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं नसल्याचंही स्पष्ट केलं.