एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना खासदार केलं, हे विसरता कामा नये; कुणाचं विधान पाहा…
आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पाहा काय म्हणाले...
अमरावती : “एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना राज्यसभेचं खासदार केलं. हे संजय राऊत यांनी विसरू नये. एकनाथ शिंदे जर नसते तर एक मतांनी निवडून येणारे संजय राऊत दहा मतांनी पडले असते. संजय राऊत यांची राज्यसभेच्या निवडणुकीत निवडून येण्याची कुवत नाही. त्यांनी लोकसभेच्या उमेदवाराला पाडण्याची भाषा करू नये. 56 संजय राऊत जरी आले तरी श्रीकांत शिंदेंना कुणी पाडू शकत नाही”, अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Jan 28, 2023 01:23 PM
Latest Videos