Ravi Rana On Vinayak Mete : चांगला नेता गमावला, महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धक्का-आमदार रवी राणा
विनायक मेटे हे माझे चांगले मित्र होते. मला मोठा धक्का बसला. हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशी भावना आमदार रवी राणांनी विनायक मेटेंच्या निधनावर व्यक्त केली आहे.
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांच्या निधनाची बातमी सकाळी आली. विनायक मेटे हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनं मला मोठा धक्का बसला. खरं तर हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशी भावना आमदार रवी राणा यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर व्यक्त केली आहे. आज मुंबईमध्ये मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी मुंबईच्या (Mumbai) दिशेने येताना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला. ही अपघाताची घटना खोपलीमधल्या बातम बोगद्याजवळ घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विनायक मेटे यांना बैठकीसाठी बोलावल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, येतानाच त्यांचा अपघात झाल्याची बातमी पहाटेच समोर आली. मेटेंच्या निधनावर दिग्गजांना शोक व्यक्त केला आहे.