“उद्धव ठाकरे मविआची चाकरी करतायत”, रवी राणा यांचा गंभीर आरोप
शिवसेनेच्या वर्धापनदिनावरून आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सगळ्यात मोठे गद्दार उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, तर एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी अहंकारापोटी सत्तेचा दुरुपयोग करून आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनावरून आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सगळ्यात मोठे गद्दार उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, तर एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी अहंकारापोटी सत्तेचा दुरुपयोग करून आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. आम्हाला १४ दिवस कारागृहात काढावे लागले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार विसरले म्हणून त्यांच्यावर ही पाळी आली. ते महाविकास आघाडीची चाकरी करत आहेत,” असं रवी राणा म्हणाले. “हनुमान चालिसाप्रकरणी आम्हाला गुन्हेगार सारखी वागणूक मिळते, तारखांना हजर रहावं लागतं, सरकारला विनंती आहे की या केसेस लवकर मागे घ्याव्यात,” अशी विनंतर रवी राणा यांनी केली आहे.
Published on: Jun 20, 2023 12:52 PM
Latest Videos