दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चांवर रविकांत तुपकर स्पष्टच म्हणाले; “रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत…”
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वत: रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बुलढाणा, 8 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत्या नेतृत्वावर उघड नाराजी देखील व्यक्त केली आहे. याच दरम्यान रविकांत तुपकर यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. यावरून रविकांत तुपकर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर स्वत: रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या केवळ अफवा आहेत. मला संघटनेत राहूनच काम करायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे. माझ्यासाठी शेतकरी हा माझा आत्मा आहे. शेतकरी हा माझा प्राण आहे. त्यामुळे मी त्यांच्याचसाठी काम करत राहणार.”
Published on: Aug 08, 2023 11:07 AM
Latest Videos