“गुलाबराव पाटील असंवेदनशील पालकमंत्री”, पूर परिस्थितीवरून रविकांत तुपकर यांनी सुनावले खडेबोल
काल बुलढाण्यात ढगफूटी झाली. त्यामुळे पांडव नदीला पूर आला आणि नदीचं पाणी काही गावांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आज शेतकरी नेते रविकांत तुकर यांनी या संग्रामपूर- शेगाव तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी केली.
बुलढाणा, 24 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल बुलढाण्यात ढगफूटी झाली. त्यामुळे पांडव नदीला पूर आला आणि नदीचं पाणी काही गावांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे. आज शेतकरी नेते रविकांत तुकर यांनी या संग्रामपूर- शेगाव तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तुपकरांची सरकारकडे मागणी केली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “48 तास उलटून गेल्यावर ही पालकमंत्री, राज्य सरकारचा एकाही मंत्री इथे आलेला नाहीय. गुलाबराव पाटील हे असंवेदनशील पालकमंत्री आहेत, इथल्या नागरिकांमध्ये राज्य सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.”