“प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा”, रवींद्र धंगेकर यांचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना ताब्यात घेतले आहे.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी धंगेकर म्हणाले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपुरकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर त्यांचा पुणे दौरा म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात येणं आणि लोकांना खोटी आश्वासन देऊन निघून जाणं असाच आहे. लोकांना थापा मारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही पीएम मोदी यांच्या दौऱ्याचा निषेध करत आहोत.”
Published on: Aug 01, 2023 10:41 AM
Latest Videos