डोक्यावर फेटा बांधून रविंद्र धंगेकर यांनी घेतली आमदारकीची शपथ
Ravindra Dhangekar in Maharashtra Assembly : कसब्याचं मैदान मारल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदाच विधिमंडळात दाखल झाले. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. पाहा व्हीडिओ...
मुंबई : पुण्यातील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली. निवडून आल्यानंतर धंगेकर आज पहिल्यांदाच विधिमंडळात आले. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. शपथविधीवेळी त्यांनी फेटा बांधला होता. कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय खेचून आणला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसब्यात काँग्रेसचे उमेदवार असणारे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. महाविकास आघाडीच्या या विजयाची राज्यभर चर्चा झाली.
Published on: Mar 09, 2023 12:22 PM
Latest Videos