लोकसभा निवडणूक लढणार? रविंद्र धंगेकर यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपला पुढचा इरादा सांगितला...

लोकसभा निवडणूक लढणार? रविंद्र धंगेकर यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपला पुढचा इरादा सांगितला…

| Updated on: Mar 22, 2023 | 11:36 AM

Ravindra Dhangekar on loksabha Election 2024 : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा बनवला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यावर रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

पुणे : आज गुढी पाडव्याचा सण. नवसंकल्प करण्याचा हा दिवस. सर्वच जण काही ना काही संकल्प करत असतात. अशात पुण्यातील कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा बनवला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यावर रविंद्र धंगेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा! कसब्याच्या जनतेने मला निवडून दिलंय. मी सध्या कसब्यात रमलो आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी नाही. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये अनेक जेष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी जो उमेदवार देणार त्याच्या मागे आम्ही उभं राहणार. त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत. तसंच 500 चौरस फुटापर्यंत घरांना मिळकत कर माफ करावा. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तोच नियम लागू करावा, असंही धंगेकर म्हणालेत.

Published on: Mar 22, 2023 11:35 AM