“आळंदीतील वारकऱ्यांवर लाठीचार्ज! सरकार तालिबानी पद्धतीने वागतयं”, कोणी केली टीका?
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरला जातात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे जायला निघाले आहेत. दरम्यान आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.
बुलढाणा : दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरला जातात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे जायला निघाले आहेत. दरम्यान आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. तुपकर म्हणाले, “वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून वारकऱ्यांनी त्यांची संस्कृती जपली आहे. अशा लोकांवर लाठीचार्ज होणे म्हणजे दुर्दैव आहे. यामुळे सर्वाचे मनं दु:खावले आहे. तर सरकार वारकऱ्यांसोबत तालिबानी पद्धतीने वागत आहे.”
Published on: Jun 13, 2023 12:09 PM
Latest Videos