RBI Bank 2000 Note Ban : दोन हजारची नोट बंद! ठाणेकरांप्रमाणे तुम्ही ही डोकं लढवाच; नोट घ्या अन् येथे जा

RBI Bank 2000 Note Ban : दोन हजारची नोट बंद! ठाणेकरांप्रमाणे तुम्ही ही डोकं लढवाच; नोट घ्या अन् येथे जा

| Updated on: May 20, 2023 | 3:09 PM

8 नोव्हेंबरच्या संध्याकाळी केंद्र सरकारने अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या आणि काल 19 मे रोजी 2000 च्या नोटा बंद केल्या जात आहेत. यावरून अनेकांना आता बँकच्या बाहेर थांबावं लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे : शुक्रवारी आरबीआयने 2000 च्या नोटा बंदीचा आदेश काढत अनेकांचा धक्का दिला. तर या नोटा आपण परत घेत असल्याचे त्यांनी निवेदनातून सांगितलं. त्यामुळे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करता येणार आहेत. त्यामुळे अनेकांना आता 2016 आठवलं आहे. त्यावेळी 8 नोव्हेंबरच्या संध्याकाळी केंद्र सरकारने अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या आणि काल 19 मे रोजी 2000 च्या नोटा बंद केल्या जात आहेत. यावरून अनेकांना आता बँकच्या बाहेर थांबावं लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र यादरम्यान ठाण्यातील माजीवाडा पेट्रोल पंपावरती 2000 च्या नोटा घेऊन नागरिक इंधन भरताना दिसून येत आहेत. बँकेमध्ये गर्दी करण्यापेक्षा या 2000 च्या नोटा वापरून नागरिक इंधन भरण्यासाठी माजीवाडा पेट्रोल पंप या ठिकाणी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत. तर विशेष बाब म्हणजे सुट्टे देण्यासाठी पेट्रोल पपं चालकाच्या वतीने सोय देखील करण्यात आलेली आहे.

Published on: May 20, 2023 03:03 PM