आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले,बँकेबाहेर रांगाच रांगा…
या बँकेत अनेक लोकांचे पैसे अडकले आहे. या बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. आरबीआयने बँकेच्या सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेकांच्या मुलांची लग्ने, आणि इतर कामांसाठी पैसे ठेवलेले अडकले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशभरात अनेक ठिकाणी शाखा असलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर आत ठेवीदारामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे, अनेकांना आपल्या आयुष्य़ाची जमापुंजी या बँकेत ठेवली असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पुणे ते पालघर या बँकेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या बँकेतून आता पैसे काढण्यावरही बंदी घातली आहेत. यामुळे ग्राहक हवाल दिल झाले आहेत. या बँकेच्या देशात 26 शाखा आहेत. त्यात लाखो खातेदारांचे पैसे आहेत.मार्च २०२४ अखेर पर्यंत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत एकूण २४३६ कोटी रुपये जमा झाले होते. ज्या ग्राहकांचा ठेव विमा योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. म्हणजे, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक बुडाली तरी ५ लाख रुपयांच्या ठेवी परत मिळतील असे सांगण्यात येत आहे. या बँकेला नवीन कर्ज, फिक्स्ड डिपॉझिट, पैसे स्वीकारणे पैसा जमा करणे या सर्वांवर बँकेची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बंदी घातली आहे.