श्रीकांत शिंदे-भाजप वादावर गिरिश महाजन यांनी दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘थोडी फार कुजबुज’

श्रीकांत शिंदे-भाजप वादावर गिरिश महाजन यांनी दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘थोडी फार कुजबुज’

| Updated on: Jun 11, 2023 | 3:45 PM

त्यानंतर आता थेट शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाच येथे भाजपच्या पहाधिकाऱ्यांनी विरोध केला. तसेच भाजप देईल तोच खासदार अशी भूमिका घेतली. यावरून आता वाद होत असतानाच त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यानंतर शिंदे गटात आणि भाजपमध्ये मतभेद वाढल्याचं बोललं जात आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. याच्याआधीही यावरून काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता थेट शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाच येथे भाजपच्या पहाधिकाऱ्यांनी विरोध केला. तसेच भाजप देईल तोच खासदार अशी भूमिका घेतली. यावरून आता वाद होत असतानाच त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यानंतर शिंदे गटात आणि भाजपमध्ये मतभेद वाढल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरिश महाजन यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी, यावर प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत. त्यामुळे हा विषय येथेच संपला आहे. मात्र थोडी फार कुजबुज कार्यकर्त्यांची सुरूच असतेच. हा विषय एवढा मोठा नाही. वरिष्ठ पातळीवरती ही यावर चर्चा झालेली आहे. त्यामुळे हा विषय संपलेला असल्याचं म्हटलं आहे.

Published on: Jun 11, 2023 03:45 PM