शिंदे-शिवसेने गटातील आमदार आमने-सामने
आमदार शहाजी पाटील आल्यानंतर मात्र सगळ्यांनी झाडी आली झाडी आली अशी चर्चा जोरदारपणे करण्यात आली.
राष्ट्रपती निवडणुकीवेळी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील आमदार आमनेसामने आल्यानंतर अनेक जणांच्या चेहऱ्यावरच हावभाव बदलत हस्ताआंदोलन करत वातावरण खेळीमेळीचे करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार शहाजी बापू पाटील आल्यानंतर माध्यम प्रतिनिधी त्यांचे हावभाव टिपण्यासाठी गर्दी केली होती. इतरवेळी शिंदे गट आणि शिवसेनेचे आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी यावेळी मात्र वातावरण एकदम खेळीमेळीचे ठेवण्यात आले होते. आमदार शहाजी पाटील आल्यानंतर मात्र सगळ्यांनी झाडी आली झाडी आली अशी चर्चा जोरदारपणे करण्यात आली.
Published on: Jul 18, 2022 08:28 PM
Latest Videos