सरकारला उशीर होतोय मात्र चांगले निर्णय घेत आहेत…
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागेल की नाही माहिती नाही मात्र सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगले निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकार स्थापन होण्यासाठी उशीर लागतो आहे हे खरं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत हे महत्वाचं असल्याचेही त्यांनी सांगितले. थोड्याच दिवसात शिंदे-फडणवीस सरकारचा […]
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागेल की नाही माहिती नाही मात्र सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगले निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकार स्थापन होण्यासाठी उशीर लागतो आहे हे खरं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत हे महत्वाचं असल्याचेही त्यांनी सांगितले. थोड्याच दिवसात शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्र्यालयातील अधिकाऱ्याव हात उगारल्याप्रकरणी ते आज न्यायालयात हजर होण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शिंदे-फडणवीस सरकार लोकांची कामं करत असल्याने माझा मंत्री मंडळात समावेश होईल की नाही हे महत्वाचं नाही तर सरकार चांगले निर्णय घेत आहे हे महत्वाचं आहे.
Published on: Jul 16, 2022 08:00 PM
Latest Videos