Special Report | बंडखोर नेत्यांचं शक्तिप्रदर्शन
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराजे आपल्या पाटण मतदारसंघात पोहोचले यांचेही कार्यकर्त्यांनी जगदीश स्वागत केले. पावसात एवढी माणसं आहेत तर कडक उन्हात पन्नास पटीनं येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले नेते आपापल्या मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करत आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या काही नेत्यांनी आणि खासदारांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं आहे, तर गुलाबराव पाटील यांनी जंगी रॅली काढली. रॅलीनंतर हे शक्तिप्रदर्शन नाही तर लोकांचा प्रेम असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. पण काल गुलाबराव पाटील जिथे, जिथे गेले तिथे तिथे आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केला त्या पुतळ्यांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराजे आपल्या पाटण मतदारसंघात पोहोचले यांचेही कार्यकर्त्यांनी जगदीश स्वागत केले. पावसात एवढी माणसं आहेत तर कडक उन्हात पन्नास पटीनं येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.