शिंदे गटाबाबत मोठी बातमी! अपात्रतेच्या नोटिशीवरून अध्यक्षांकडे केली कोणती विनंती?
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य १६ आमदारांना नोटीस जारी केली होती. तर त्यांना अपात्रतेच्या कारवाईसाठी उत्तर देण्यास सांगितले होते. तर या नोटिशीला सात दिवसात उत्तर देण्याची मुदत होती.
मुंबई | 25 जुलै 2023 : शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य १६ आमदारांना नोटीस जारी केली होती. तर त्यांना अपात्रतेच्या कारवाईसाठी उत्तर देण्यास सांगितले होते. तर या नोटिशीला सात दिवसात उत्तर देण्याची मुदत होती. मात्र अजूनही त्यावर शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आलेलं नाही. त्याचदरम्यान आता राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असल्याचे सगळे आमदार हे यात व्यस्त आहेत. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात पूराची स्थिती निर्माण झाल्याचे आमदार त्यांच्या मतदार संघात गेले आहेत. याचदरम्यान आता शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदतवाढिची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.