गद्दारांचा जागा गद्दारांना दाखवणार...

गद्दारांचा जागा गद्दारांना दाखवणार…

| Updated on: Aug 11, 2022 | 5:50 PM

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसैनिकांना आपण स्पष्टीकरण देणार नाही असं संजय मंडलकांनी स्पष्ट केले होते, त्यानंतर आज शिवसैनिकांनी त्यांच्यावरचा रोष व्यक्त केला आहे. 

कोल्हापुरचे खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरातून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या मंडलिकांनी शिंदे गटातील प्रवेशबाबत उत्तर द्यावं अशी टीका करण्यात आली होती, त्यानंतर संजय मंडलिकांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसैनिकांना उत्तर द्यायला तुम्ही काय प्रशासकीय यंत्रणा नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसैनिकांचा रोष अधिकच वाढला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणांनाच घेऊन तुम्ही निवडणूक लढवा असं स्पष्ट शब्दात त्यांना उत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसैनिकांना आपण स्पष्टीकरण देणार नाही असं संजय मंडलकांनी स्पष्ट केले होते, त्यानंतर आज शिवसैनिकांनी त्यांच्यावरचा रोष व्यक्त केला आहे.