Buldana | बुलढाण्यात खासगी कोविड सेंटरमध्ये महिलेचं मंगळसूत्र घेऊन थकबाकीची वसूल

| Updated on: May 23, 2021 | 5:29 PM

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गवई कुटुंबावर पतीला डिस्चार्ज झाल्यावर बिल भरण्यास 11 हजार रुपये कमी पडल्याने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्रच कोविड सेंटरने ठेऊन घेतले. (Recovery of arrears by taking a woman's mangalsutra at a private covid center in Buldhana)

बुलडाणा : कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या भितीचा गैरफायदा काही डॉक्टर घेत असल्याचा प्रकार खामगाव येथे समोर आला आहे. रुग्णाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार घडलाय. कोरोना बाधित नसताना एमआरआय च्या रिपोर्टवरुन पतीवर कोरोनाचे 9 दिवस उपचार केले गेले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गवई कुटुंबावर पतीला डिस्चार्ज झाल्यावर बिल भरण्यास 11 हजार रुपये कमी पडल्याने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्रच कोविड सेंटरने ठेऊन घेतले आणि नंतर रुग्णाला घरी सोडले. खामगाव येथील अश्विनी कोविड सेंटरमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला आहे.