क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबईतही ठाण्याप्रमाणे क्लस्टर डेव्हलपमेंटमधून इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.त्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आपण दैनिक सामनाच्या कार्यालयासमोर आलो असलो तरी ‘सामना’ करायला आलेलो नाही. येथे आमची शाखा आहे. त्यामुळे येथे आलो असून सामनात देखील आपलीच माणसे आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. जर एका एका इमारतीचा पुनर्विकास करायचा म्हटला तर ओपन स्पेस मिळणार नाही. खेळायला जागा मिळणार नाही. आरोग्य केंद्राला जागा मिळणार नाही. त्यामुळे मुंबईत ठाण्याप्रमाणेत सहा इमारतींचा एकत्रित पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मोठे घर मिळेल. आणि मुंबईबाहेर फेकल्या गेलेल्या मुळ मुंबईकरांना पुन्हा मुंबईत त्याच्या हक्काच्या घरात आणता येईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हाऊसिंग डिपोर्टमेंट आपल्याकडेच असल्याने ठाण्यात आता ज्याप्रमाण क्लस्टर डेव्हलपमेंटची कामे सुरु झाली आहेत तशी कामे मुंबईत देखील करता येतील असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा

शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट

पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का

'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
