छत्रपती संभाजीराजे यांनी पहाटेच्या 'त्या' शपथविधीवरून पवार, फडणवीस यांची लेव्हल मोजली, काय म्हणाले पाहा

छत्रपती संभाजीराजे यांनी पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीवरून पवार, फडणवीस यांची लेव्हल मोजली, काय म्हणाले पाहा

| Updated on: Feb 14, 2023 | 1:22 PM

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची घेतलेला त्या सकाळच्या शपथविधी सोहळ्याची पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.

औरंगाबाद : भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची घेतलेला त्या सकाळच्या शपथविधी सोहळ्याची पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण, ही प्रतिक्रिया देताना त्यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची लेव्हल सांगितली आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. मात्र, त्या लेव्हलच्या चर्चा कशा झाल्या असतील ते माहित नाही. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस मोठे नेते आहेत. मी अजून त्यांच्याइतक्या मोठ्या पदावर पोहोचलो नाही. त्यामुळे त्या लेव्हलवर काय चर्चा झाल्या असतील ते मला माहित नाही. त्यांच्या लेव्हरलवर मी ज्यावेळी पोहोचेन त्यावेळीच अधिक बोलेन असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

Published on: Feb 14, 2023 01:22 PM