Vijay Vadettiwar on Kashmir | काश्मिरी पंडितांवर हल्ले वाढले, केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
केंद्राने कडक भूमिका घ्यावी. उपयोजना करावी, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
नागपूर : राज्यात वाढणाऱ्या कोरोनाबाधीतांची संख्या (corona patient) ही चिंता वाढवणारी आहे. तर कडक निर्बंध टाळायचे असतील स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पुढची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल असे राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांनी केलंय. याच बरोबर त्यांना पत्रकारांनी काश्मीर किलिंगबाबत (Kashmir Killing) विचारले असता त्यांनी, काश्मिरी पंडितांचा मुद्दा आपण पाहिले आहेत. त्या काळातील परिस्थिती निवळले होती. पर्यटक जात होते. हे हल्ले केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. केंद्राने कडक भूमिका घ्यावी. उपयोजना करावी, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, संघप्रमुखांच्या भूमिकेच स्वागत आहे. लोकांना, धर्म पंतांना जोडण्याची स्वागत आहे. ही भूमिका कायम राहिली पाहिजे. जुन्या गोष्टी उकळून काढणे आणि वाद निर्माण करणे हे टाळण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो मात्र ही भूमिका कायम राहिली पाहिजे, असंही ते म्हणाले. काँग्रेस हिंदूबाबत ते म्हणाले, काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची आहे. धर्म घरी आणि संविधान मानणारे आम्ही आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.