VIDEO : भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबार करत रिलायन्स ज्वेलर्स लुटले; सहा ते सात जणांच्या टोळीने केला हाथ साफ
सांगली-मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. सांगली- मिरज रस्त्यावर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला.
सांगली : शहरातील रिलायन्स ज्वेलर्स शॉपी भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये कोटींच्या सोन्याच्या दागिने लुटण्यात आली आहेत. त्याचबरोबर गोळीबार करत कर्मचारी आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही मारहान करण्यात आली आहे. दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचे सि्सिटिव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत. मिळालेली माहिती अशी की, सांगली-मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. सांगली- मिरज रस्त्यावर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटून नेण्यात आले. यावेळी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, दुकानाबाहेर श्वान घुटमळले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
