प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क सज्ज, पाहा व्हीडिओ...

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क सज्ज, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Jan 26, 2023 | 8:43 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर औपचारिक परेड आणि सार्वजनिक कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाहा व्हीडिओ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर औपचारिक परेड आणि सार्वजनिक कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडेल. मंत्रालय , म्हाडा, नगरविकास विभाग, एसआरए, शिक्षण विभाग असे अनेक देखावे आज इथं सादर करण्यात येणार आहेत. 26 जानेवारीला देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर हा संपूर्ण परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. 24 तासांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. तसेच कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. हल्ल्याचा इशारा पाहता मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published on: Jan 26, 2023 08:41 AM