महाविकास आघाडीतील आणखी एक नेता महायुतीसोबत जाणार? काँग्रेसवर केली टीका

महाविकास आघाडीतील आणखी एक नेता महायुतीसोबत जाणार? काँग्रेसवर केली टीका

| Updated on: Aug 16, 2023 | 1:08 PM

महाविकास आघाडीला धक्के बसतानाच महायुती मजबूत होत आहे. राज्यात अजित पवार गट हा सत्तेत गेल्यानंतर आता मविआला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

नागपूर : 16 ऑगस्ट 2023 | महाविकास आघाडीमध्ये सध्या फुटाफूट होताना दिसत आहे. येथे एका वर्षाआधी शिवसेना फुटली. ज्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट बनला. त्यानंतर आता एका महिन्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवार, अजित पवार गट निर्माण झाला. तर आता शरद पवार आणि अजित पवार गुप्त भेटीमुळेच मविआच्या अस्तित्वावरच आली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसकडून निर्णय घेत शरद पवार यांनाच महाविकास आघाडीतून बाजूला केले जाण्याची शक्यता आहे. असे एकना अनेक धक्के मविआला बसले असतानाच आता आणखीन एक बडा नेता मविआवर नाराज झाला आहे. तर तो भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया पक्षाचे नेते डॅा. राजेंद्र गवई हे मविआवर नाराज असून त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तर महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तसेच गवई हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Aug 16, 2023 01:08 PM