आरक्षण मागा पण ओबीसीमधून नको, ‘या’ नेत्याची जरांगे पाटील यांना विनंती
१५ प्रमुख मुद्दे यावर चराच झाली त्यावर सरकारने लेखी आरक्षण दिले. दाखले तपासून प्रमाणपत्र द्यावे. ओबीसी जातगणना सरकार करणार आहे. सरकारला जे शक्य आहे तेच करत. जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मागावे. पण ते ओबीसीमधून आरक्षण मागताहेत हे चुकीचे आहे.
नागपूर : | 18 ऑक्टोंबर 2023 : जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. या अल्टिमेटमला सहा दिवस बाकी आहेत. अशातच राज्य सरकारने ओबीसींच्या बैठकीचं इतिवृत्त जाहिर केलंय. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी समाजाच्या १५ मागण्या मान्य करत असल्याचं सरकारनं लेखी स्वरुपात दिलंय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या मागणीचं काय होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं इतिवृत्त जाहिर करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, असं राज्य सरकारने लेखी दिलंय. त्यामुळे जरांगे पाटील यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी चुकीची आहे. त्यांनी अशी मागणी करु नये. त्यांनी वेगळं आरक्षण मागावं, असं माजी मंत्री आणि भाजप नेते परिणय फुके म्हणालेत.
Published on: Oct 18, 2023 05:56 PM
Latest Videos
![भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या? भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/chhagan-bhujbal-1-2.jpg?w=280&ar=16:9)
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
![भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.... भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/crime-mumbai-1.jpg?w=280&ar=16:9)
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
![नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्... नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/shinde-cm-.jpg?w=280&ar=16:9)
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
![शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/sanjay-shirsat-1.jpg?w=280&ar=16:9)
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
!['तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी 'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/tanaji-sawant-1.jpg?w=280&ar=16:9)