कशाला बँकेचा फेरा… हाय की दुकानं!; 2000 हजारच्या नोटा थेट सोन्यात; कुठं सुरू उलाढाल
चार महिने वेळ दोन हजाराच्या नोटा बदलू घेण्यासाठी दिला दिला असताना लोक सोने खरेदीला पसंती देत आहेत. दोन हजारांच्या नोटबंदीचा जळगावातील सराफ बाजारावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे.
जळगाव : रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणली आहे. त्यामुळे त्याचे विविध परिणाम घडत आहेत. सध्या बाजारात यामुळे काय चित्र निर्माण झाले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत, जे पाहून तुम्हीही थक्कच व्हाल… चार महिने वेळ दोन हजाराच्या नोटा बदलू घेण्यासाठी दिला दिला असताना लोक सोने खरेदीला पसंती देत आहेत. दोन हजारांच्या नोटबंदीचा जळगावातील सराफ बाजारावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. अस्सल सोनं कुठं मिळत असेल तर ते जळगावच्या सराफ बाजारात. याठिकाणी मिळणारं सोनं हे शंभर टक्के शुद्ध असतं आणि व्यवहार सचोटीचा असते, अशी ग्राहकांची भावना आहे. त्यामुळे जळगावला सुवर्ण नगरी म्हटलं जातं. दोन हजारांची नोटबंदी झाल्यानंतर सुवर्णनगरीतल्या व्यवहारांवर काहीअंशी सकारात्मक परिणाम झालाय. ज्या लोकांकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, त्या बँकेतून बदलून घेण्याऐवजी अनेक जण सोनं चांदीचे दागिने खरेदी करताय. विशेष करून ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे, ते लोक सोनं घेताय. मुळात लोकांकडे दोन हजारांच्या नोटा कमी प्रमाणात होत्या. त्यामुळे हे प्रमाण फारसं नसल्याचंही सराफांनी सांगितलं.