‘त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल’; सामना अग्रलेखातून भाजपसह शिंदे गटावर खरमरीत टीका
यावरूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामना मधून देखील टीका करण्यात आली आहे. यावेळी सामनातून पंतप्रधानांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही.
मुंबई : शुक्रवारी (19 मे) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Demonetization) एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बाजारातून आता दोन हजाराच्या नोटा बंद (Demonetization) होणार आहेत. त्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका केली. यावरूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामना मधून देखील टीका करण्यात आली आहे. यावेळी सामनातून पंतप्रधानांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. सर्व राष्ट्रीय कामे बाजूला ठेवून पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुका, सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली गेली. पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. 50 खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल. त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल. त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल अशी टीका करण्यात आली आहे.