राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल? प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावाची चर्चा सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल? प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावाची चर्चा सुरु

| Updated on: Feb 11, 2023 | 8:31 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल केले जाणार आहे अशी माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा तीन वर्षाचा कालावधी संपला आहे.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादामुळे नाना पटोले यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल केले जाणार आहे अशी माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा तीन वर्षाचा कालावधी संपला आहे. त्यांच्या जागी आता नव्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. कोरोनामुळे जयंत पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. तसेच पक्षात इतरही काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. जयंत पाटील यांच्या जागी आक्रमक चेहरा निवडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.