'राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड : संजय राऊत

‘राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड : संजय राऊत

| Updated on: Jan 07, 2023 | 8:01 AM

नारायण राणेंना उत्तर देताना राऊत यांनी, मी सांगतो माझे नाव संजय राऊत आहे. राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड. कुठे येऊ, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजन्सीला घाबरत नाही, असा दमच त्यांनी राणेंना दिला आहे.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शाब्दिक वाद रंगला आहे. राऊतांचा परत तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असे नारायण राणेंनी म्हणताच संजय राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केला. अशातच संजय राऊतांनी नारायण राणेंना सज्जड दम भरला आहे. तसेच राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड आहे, असेही राऊत म्हणाले.

मी, नारायण राणेंना उत्तर दिल्यापासून त्यांना माझी ओळख लागत नाही. मी कोण ते असे विचारतात, मी त्याला पत्रकार मानत नाही, असे ते म्हणतात. असो पण हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले आहे.

तरी मी सांगतो माझे नाव संजय राऊत आहे. राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड. कुठे येऊ, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजन्सीला घाबरत नाही, असा दमच त्यांनी राणेंना दिला आहे.

राणे यांनी यांच्या आधी राऊत यांच्यावर निशाणा साधताना, मी अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवले आहे. माझ्या लक्षात सगळं राहतं. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. हा माझा वाईट स्वभाव आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असा निशाणा नारायण राणे यांनी संजय राऊतांवर साधला होता.

Published on: Jan 07, 2023 08:01 AM