CM Eknath Shinde | ‘पोलिसांना बीबीडी चाळीत 15 लाखात घरं देण्यात येणार’- tv9
मुख्यमंत्री शिंदे यांनी बीडीडी चाळीत पोलिसांना 15 लाखांमध्ये मालकी हक्काची सदनिका देण्यात येईल, असेही म्हटलं आहे.
सेवानिवृत्त तसेच सध्या सेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांना बीडीडी पुनर्विकासांतर्गत 50 लाखांत घरे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र पोलिसांना घरांच्या या किमती अमान्य होत्या. तर ती घरे 15 ते 20 लाखांत देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता बीबीडी चाळीत पोलिसांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी बीडीडी चाळीत पोलिसांना 15 लाखांमध्ये मालकी हक्काची सदनिका देण्यात येईल, असेही म्हटलं आहे.
Latest Videos